शिक्षणाची उद्दिष्टे व महत्त्व
शिक्षणाची उद्दिष्टे व महत्त्व मित्रांनो, आज शिक्षणाबद्दल समाजात मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झालेली आहे. प्रत्येक पालकाला असे वाटते की, आपल्या मुलाने खूप शिकावे. त्यासाठी तो आपल्या ऐपतीप्रमाणे खर्चही करत असतो. आज खेडोपाडी सरकारी व खाजगी शाळा पोहचलेल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारेही शिक्षणावर बर्यापैकी खर्च करत असतात. असा शिक्षणाचा सगळीकडे उदो-उदो सुरू असताना शिक्षणाची उद्दिष्ट्ये व मानवी जीवनातील शिक्षणाचे नेमके महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. तेव्हा माझा आतापर्यंतचा अनुभव, शिक्षणाचा मला झालेला लाभ, माझा थोडाफार अभ्यास व चिंतन, इतरांशी झालेल्या चर्चा या आधारे माझे पुढील विचार मी अतिशय नम्रतेने मांडत आहे. शिक्षणाची उद्दिष्ट्ये १) ज्ञानवृद्धी- मित्रांनो, शिक्षणामुळे आपल्या ज्ञानामध्ये वाढ होते. मानवी जीवनाबद्दल, निसर्गाबद्दल, एकूणच जगण्याबद्दल आपली समज, आकलन वाढते. ही समज-आकलन कशी वाढते? तर त्यासाठी अभ्यासक्रमात इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, ...